मुखेडात सीएए व एनआरसीच्या समर्थनार्थ भव्य रॅली ; 180 फुटाचा तिरंगा झेंडयासहीत युवकांचा मोठा सहभाग

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड :  ज्ञानेश्वर  डोईजड

भारताच्या संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमतानी मंजूर केलेल्या नागरिक संशोधन कायदा-2019 च्या समर्थनार्थ मुखेड येथील सर्व राष्ट्रप्रेमी नागरीक व भाजपा, विश्वहिंदु परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सर्व समाजातील नागरीकांच्या वतीने मुखेडात सीएए व एनआरसीच्या समर्थनार्थ भव्य रॅली दि. 24 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता विरभद्र मंदीर पासुन काढण्यात आली.

बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या आपल्या तीन शेजारी देशांमध्ये राहणाया हिंदू, शीख, ख्रिश्चन, पारसी, जैन, बौद्ध या नागरिकांना तेथे केवळ धर्माच्या आधारावर अत्याचारांमुळे प्रताडीत होऊन भारताच्या आश्रयाला आल्यानंतर भारताचे नागरिकत्त्व स्वीकारता येईल असे या कायदयात असुन पण काही राजकारणी त्यांची पोळी भाजण्यासाठी या कायदयाचा वापर करुन समाजा तेढ निर्माण करीत असुन समाजातील सर्व घटकातील नागरीकांनी या कायदयाबबत नागरीकांना समजुन सांगावे व समाजातील वाढत चाललेली दरी कमी करण्याचा प्रयत्न करवा असे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

सदर रॅली विरभद्र मंदीर पासुन ते तेलीपेठ हनुमान मंदीर ते बसस्थानक चौक व छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आले. या रॅलीत 180 फुटाचा तिरंगा झेंडा सर्व नागरीकांचया हातात होता या तिरंगा झेंडयाचे सर्व शहरातुन राष्ट्रप्रेमी नागरीकांनी भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीस तालुक्यातील मोठया संख्येने नागरीक, युवक उपस्थित होते तर या रॅलीस पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर व पोउनि गणपत चित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नागरीकत्व संशोधन कायदा व राष्ट्रीय नागरीक नोंदणीच्या समर्थनाचे निवेदन तहसिल कार्यालय मुखेड येथे देण्यात आले. यावेळी आ.डॉ. तुषार राठोड, सत्यवाणअण्णा गरुडकर, डॉ. विरभद्र हिमगिरे, महेश मुक्कावार, अनिलशेठ जाजु, अतुल सावकार देबडवार, जगदीश शेठ बियाणी, प्रा. विनोद आडेपवार, डॉ. माधव उच्चेकर, शंकर नाईनवाड,किशोरसिंह चौहाण,संजय वाघमारे, राम सावळेश्वर, ज्ञानेश्वर डोईजड,विनोद रोडगे, शंकर अण्णा पोतदार,अशोक गजलवाड, शेखर पाटील, दिपक मुक्कावार, महावीर शिवपुजे, नितीन टोकलवाड, आकाश पोतदार, राजकुमार बामणे, योगेश पाळेकर, गिरीष देशपाडे, गोविंद जाधव, तानाजी जांगडे,भगवान गुंडावार, नामदेव यलकटवार, पवन पोतदार, विजय किन्हाळकर, विनोद पोतदार, संदिपभाऊ पोफळे, अमोल मडगुलवार,सचिन श्रीरामे, गोविंद घोगरे, राजेश गजलवाड, गजानन पांचाळ, राम सावळेश्वर, मन्मथ मुंगडे, किशोर मस्कले, प्रमोद मदारीवाले,शंकर चिंतमवाड,  कैलास पोतदार, विजय कोत्तापल्ले, कमलाकर आगदे, विजयकुमार स्वामी, बळीराम बोमनवाड, बबन ठाकुर, बंटीशेठ कोडगीर, विनोद दंडलवाड, जीवण कवटीकवार, शिवाजी राठोड, बजरंग कल्याणी, कैलास एकाळे,सुधीर चव्हाण, भवानीसिंह चौहान, काशिनाथ येवते, हिरा चौधरी, रामराव मस्कले, अमर ठाकुर, बालाजी मेहरकर,नरेंद्र कळसकर, राजेश भागवतकर, सचिन टेंभुर्णे , संदीप पिल्लेवाड, विठ्ठल रुमाले, विजय लघुळे, यांच्य्यासह  अनेक राष्ट्रप्रेमी नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.