अद्भुत, अविश्वसनीय व अकल्पनीय चक्क डोळयावर पट्टी बांधुन ओळखते नोटांचा नंबर                 पुस्तकावरील अक्षर ओळखणे, आय.डी कार्ड ओळखही सहज ………….. मुखेड मधील नंदिनी एकाळेकडे अद्भूत कला

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड शहरातील मेडीकल व्यवसायात असलेले संतोष एकाळे यांची मुलगी नंदनी एकाळे वय 12 वर्ष हिने चक्क डोळयावर पट्टी बांधुन नोटांचा नंबर व विविध प्रकारचे पुस्तक वाचन केल्याने तालुक्यातील नागरीकांना आश्यर्याचा धक्काच बसला तर अनेकांनी अद्भुत, अविश्वसनीय व अकल्पनीय असल्याचे म्हटले आहे.

नंदीनी एकाळे सध्या मुखेड तालुक्यातील सलगरा येथील इंदिरा गांधी विद्यालय येथे 6 वी वर्गात शिक्षण घेत आहे. तीच्या डोळयावर पट्टी बांधुन ती चक्क नोट व नोटावरील नंबर ओळखणे, वस्तु ओळखणे, रुमालवरील रंग ओळखणे, पुस्तकावरील अक्षर ओळखणे, आय.डी कार्ड ओळखणे व त्याच्यावरील नाव ओळखणे अशा विविध प्रकारचा अकरा बाबी ती सहज ओळखु शकते.

अदृश्य असताना ओळखते कसे या विषयी नंदीनीला विचारले असता नंदीनी म्हणते, मी डोळे मिटल्यानंतर माझ्या हातातील चित्र माझ्या बुध्दीमध्ये तयार होते व कल्पना शक्तीच्या जोरावर मी डोळयावर पट्टी बांधुन सुध्दा नोटेवरील नंबर असो अथवा पुस्तकावरील लिखाण सहज ओळखु शकते असे म्हणाली.

नंदीनीच्या वडीलाकडुन या कलेविषयी माहिती विचारली असता त्यांनी सागितले की, हैद्राबाद येथे माझे मित्र लक्ष्मण राठोड हे आहेत. त्यांना माझ्या मुलीच्या गुणवत्तेविषयी सांगितले असता त्यांनी ही कला माझ्या मुलीस शिकवली. ही कला 6 ते 12 वयोगटातील मुलींनाचा शिकवता येते व अनेकांना शिकविले असता सुध्दा त्यांना अवगत होत नाही पण नंदीनीने ही कला केवळ तीन आठवडयात अवगत केली असुन यामुळे तीच्या अभ्यासावर जास्त लक्ष जात असुन एक वेळेस पाठांतर केले असता तीला सहज लक्षात सुध्दा राहत आहे. यामुळे तीच्या गुणवत्तेवर याचा मोठा परिणाम दिसुन येऊन लागला आहे असे म्हणाले.

नंदीनीच्या या गुणामुळे तीचे तालुक्यातील अनेक शाळेमध्ये कार्यक्रम होत असुन तीच्या गुणवत्तेमुळे अनेक विद्यार्थ्याना याचा फायदा होणार असुन शाळेतील शिक्षकही तीच्या या गुणवत्तेमुळे आचंभित झालेले आहेत तर अनेकांनी तीच्या मुलाखती सुध्दा घेतलेल्या असुन खरंच डोळयावर पट्टी बांधुन सर्वकाही डोळे उघडे असल्यासारखेच सांगत असल्याने अनेकांना अद्भुत, अविश्वसनीय व अकल्पनीय असेच वाटत आहे.