कवी राजेश जेटेवाड यांचा गौरव

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नायगाव

आदिवासी कोळी समाजाचा ८ वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिक, कवी, लेखक यांचा गौरव करण्यात आला. त्यात मांजरम येथील नवोदित कवी तथा लेखक राजेश हानमंतराव जेटेवाड, बरबडेकर यांचा पुष्पगुच्छ व ट्राफी देऊन गौरव समाजाचे नेते मा. नागनाथरावजी घिसेवाड, कवी विरभद्रजी मिरेवाड, आयोजक गंगाधररावजी कल्याणकर, कोन बनेगा करोड़पतिच्या एक करोड रुपये विजेत्या सौ. बबिताताई ताडे अदींच्या हस्ते करण्यात आला.