शारदा कंन्स्ट्रक्शनवर अवैध उत्खनाची कार्यवाही     विना परवाना उत्खनन करत शासनाच्या महसुलाला लावत होते चुना

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
             तीन हजार ब्राास अवैध उत्खनन निदर्शनास
तालुक्यात अवैध उत्खनन करणारी मोठी टोळी सक्रीय

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड – देगलुर रोडचे काम चालु असुन यासाठी शासनाने हे काम शारदा कंन्स्ट्रक्शनला दिले पण परवानगी न घेताच अवैध उत्खनन करुन शासनाच्या तिजोरीला चुना लाऊन कोटयावधीची माया जमवत होते ही बाब प्रशासनाच्च्या निदर्शनास येताच मुखेड तहसिल कार्यालयाच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी  पी एम यालावार  यांनी दि. 20 रोजी पंचनामा करत शारदा कंन्स्ट्रक्शनवर कार्यवाही केली.

तालुक्यातील मुखेड – देगलुर रोडवर शहरापासुन सात कि.मी. अंतरावर तांदळी गाव असुन मुख्य रोडच्या बाजुस असलेल्या शिवारात जेसीबीने  अंदाजे 30 हजार ब्राास मुरुमचे उत्खनन केल्याचे प्रशासनास आढळून आले. या रोडच्या मुरुम उत्खननसाठी शारदा कंन्स्ट्रक्शनने कोणत्याच प्रकारची परवानगी घेतली नाही व अवैध मुरुम देगलुर – मुखेड रोडसाठी वापरत असल्याचे निदर्शनास आले.

अवैध उत्खनन करत असताना जेसीबी व टिप्पर एम एच 24 , ए.यु.3653 व एम एच 26 बी ई 4368 हे वाहतुक करताना आढळुन आले. त्यावेळी चायमोक्याचा पंचनामा मंडळ अधिकारी पी एम यालावर, तलाठी डी जी.रातोळीकर , तलाठी प्रकाश तोटेवाड , तलाठी एस के देशमुख यांनी हा अहवाल वरीष्ठाकडे पाठविला आहे.


        तहसील कार्यालयाची परवानगी न घेता अवैध मुरूम उत्खनन होत असल्यास त्यांच्या कडक कार्यवाही करण्यात येईल. अवैध उत्खनन करणाऱ्यांंची गय केली जाणार नाही.
                                  काशिनाथ पाटील
                                 तहसीलदार, मुखेड