आमदार डॉ. राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त हेमंत खंकरे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम

नांदेड जिल्हा मुखेड
 हेमंत खंकरे , मिञ मंडळाकडून वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
मुखेड:पवन कँदरकुंठे
दि  २१ मुखेड विधान सभेचे भाजपाचे आमदार डॉ.तुषार राठोड ,यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्रमाबाद येथे सोमवार दि २३ रोजी सामाजिक , धार्मिक कार्यक्रम राबऊन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती ग्राम पंचायत सदस्य हेमंत खंकरे , यांनी दिली.
           सकाळी नऊ वाजता मुक्रमाबाद येथील गणेश मंदिरात सामूहिक महाआरती करून सामाजिक उपक्रमांना सुरूवात करण्यात येणार आहे. साडेनऊ वाजता हेमंत  खंकरे , मिञ मंडळाकडून खुल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करून  दहा वाजता शहरातील  निवासी मुकबधीर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व खाऊ वाटप, साडेदहा वाजता केतकी संगमेश्वर हॉस्पिटलमध्ये मोफत नेञ तपासणी व औषधोपचार  शिबीराचे  उद्घाटन , आकरा वाजता शहर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा दुपारी बारा वाजता आमदार डॉ . तुषार राठोड , यांचा येथील भाजपा कार्यालयात सामुदायिक वाढदिवस साजरा करण्यात येणार असून आमदार डॉ . तुषार राठोड, यांच्या वाढदिसानिमित्त घेण्यात येणाऱ्या मोफत नेञदान शिबीर , सामान्य ज्ञान व क्रिकेट स्पर्धेत खेळाडूनी सहभागी होण्याचे आवाहन हेमंत खंकरे, यांनी केले.