मुखेडात रंगन्नाथ महाराज परभणीकर यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड
मुखेड शहरात आर्यवैश्य कोमटी समाजाच्या वतीने ब्र.भू.ह.भ.प. रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या पुण्यतिथीनिमीत्त शहराच्या प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली.
         या शोभायात्रेत समाजातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने शहर आनंदमय झाले.  या शोभायात्रेत नगराध्यक्ष  बाबूराव देबडवार यांची प्रमुख उपस्थिती होती.आर्यवैश्य मंगल कार्यालय मुखेड येथे आज दि. 21 डिसेंबर ते 23 डिसेंबर पर्यंत आर्यवैश्य समाजातील संत ब्र.भू.ह.भ.प.श्री. रंगनाथ महाराज परभणीकर (गुरुजी) यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे.
       21 डिसेंबर रोजी संध्याकाळी 8 वाजता डॉ. सचिन वसंत लादे, पंढरपूर यांचे रंगनाथ महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.  दि. 22 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. ह.भ.प. श्री भानिदास महाराज सावळेश्वरकर यांचे गुलालाचे किर्तन तर रात्री 8 वा. ह.भ.प.श्री देविदास महाराज लातुरकर यांचे किर्तन व दि. 23 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. ह.भ.प. श्री नामदेव महाराज दापकेकर यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
 तरी या सर्व कार्यक्रमास मुखेड वासियांन्नी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आर्यवैश्य समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
आज समाजाच्या वतीने या पुण्यतिथीनिमीत्त शहरातून भव्य शोभायात्रचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये समाजातील प्रतिष्ठीत मान्न्यवर, पुरुष-महिला, तरुण-तरुणी मोठ्या संख्येन्ने सहभागी झाले होते.  बँड पथक, अश्वधारी रथ, आतिषबाजी, झेंडेधारी युवक, फेटेधारी महिला,  शुभ्र पांढ·या पोषाखात असलेले सर्व समाज बांधव, शिस्तबध्द एका रांगेतील शोभायात्रेनी समस्त मुखेड शहरवासियांचे मन वेधून घेतले.
यावेळी न्नगराध्यक्ष बाबूरावजी देबडवार, नंदकुमार मडगुलवार, दिपक मुक्कावार, प्रल्हाद राजकुंठवार, दिलीप कोडगिरे, उत्तम चौधरी, नगरसेवक गोपाळ पत्तेवार, शशिकांत चौधरी, प्रकाश कवटिकवार, रमेश मेडेवार, गणेश कोडगिरे, सुर्यनारायण कवटिकवार, अशोक पांपटवार, मंगेश कोडगिरे, लक्ष्मण पत्तेवार, आशोक मडगुलवार, इंजि. विलास चौधरी, डॉ. राहूल मुक्कावार, इंजि. संजय जवादवार, डॉ. सतिश बच्चेवार, डॉ. पी.बी. न्नारलावार, डॉ. शौलेंद्र कवटिकवार, गणपतराव पाळेकर, धन्नंजय कोडगिरे, जीवन्न कवटिकवार, महेश मुक्कावार, मन्नोज काडगिरे, शंकर उत्तरवार, राजेश पालावार, योगेश देबडवार, प्रमोद बच्चेवार, श्रीनिवास कोडगिरे, विलास काडगिरे, बालाजी राजकुंठवार, रमेश महाजन्न, हाणमंत गुंडावार, अनिल पत्तेवार, अशोक गंदेवार, नागेश कोडगिरे, निखील नारलावार, कुणाल लाभशेटवार, उत्तम कोडगिरे, अखिल पोलावार, वेंकटेश कवटीकवार, सुनिल कोंडावार, आशिष कवटिकवार, अजय मुक्कावार, ओंकार चौधरी, संजय चौधरी, सचिन देबडवार, नंदकुमार काचावार, सुरेश उत्तरवार, ऋषीकेश पालावार, लक्ष्मीकांत कवटिकवार, योगेश नारलावार, कृष्णा चौधरी, भास्कर पईतवार आदीसह शेकडो समाजबांधव उपस्थित होते.