बीडमधील दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; 31 जणांना ताब्यात तर 103 जनांवर होणार कारवाई !

ठळक घडामोडी महाराष्ट्र

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि एनआरसी बिल विरोधात शुक्रवारी (20 डिसेंबर) पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान बीड शहरात झालेली दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी 307(attempt to munder)तसेच 135 आणि 353 कलमानुसार गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत 31 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एकूण 103 जनांवर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

एनआरसी-सीएए कायद्याविरोधात शुक्रवारी बीड बंदची हाक देण्यात आली होती. या संदर्भात दुपार बंदला गालबोट लागले. जमावाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अचानक दगडफेक केली. जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आले. परिस्थिती तणावपूर्ण असून पोलिस लक्ष ठेऊन आहेत.