अजयदिप कंन्सट्क्शनकडून अवैध मुरुम उत्खनन    शासनाचा कोट्यावधी रुपयाच्या महसुलाला चुना 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

        कार्यवाही करण्याची मागणी

  राष्ट्रीय महामार्गावर  अनेक ठिकाणी जीवघेणे वळण

    प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे  कंन्सट्क्शनचे चांगभले..!

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड
      राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या नावाखाली अजयदिप कंन्सट्क्शन कडून लखमापुर,वंटगीर,वंळकीसह आदी गावात नियमाची पायमल्ली करीत अवैध मुरुम उत्खन करुण शासनाचा लाखो रुपये महसुल बुडवून शासनाला चुना लावण्याचे काम होत असल्याने  संबंधित विभागाकडुन याची तात्काळ चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे ता.उपप्रमुख बालाजी पसरगे यांनी तहसीलदार व जिल्ह्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
     मुखेड तालुक्यातील कुंद्राळ कँम्प ते कर्नाटक सिमा राज्यातील वझर या गावा पंर्यत च्या ४५ किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ अ चे काम गेल्या वर्षापासुन अजयदिप कंन्सट्क्शन कडून प्रगतीपथावर असताना सदर कंपनी कडुन राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या नावाखाली लखमापुर,वंळकी (वनविभागाच्या)जागेवरून,व वंटगीर या गावात अवैध मुरुम उत्खनन करून महसुल विभागाचा कोट्यावधी रुपयेचा महसूल बुडवित आहे.
    प्रशासनाच्या नियमानुसार होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गापासुन अंदाजे १ किलोमीटर अंतरावरुण महसुल विभागाच्या परवानगीने मुरुम उत्खनन करणे बंधनकारक असताना पण सदर कंपनीकडून या नियमाची पायमल्ली करीत आपल्या सोयीनुसार राष्ट्रीय महामार्गा लगत मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम उत्खनन होत असल्याने भविष्यात अपघाताचे प्रमाण वाढणार हे मात्र खरे म्हणून प्रशासनाने यावर वेळीच बंधन घालण्यात यावेत असे जाणकार नागरिकांतून बोलले जात आहे.
   अजयदिप कंन्सट्क्शन कडुन राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी जिवघेणी वळणे निर्माण करण्यात आल्यामुळे येणाऱ्या काळात हा मार्ग वाहनधारकांना डोके दुःखीचा ठरणार आहे. यामुळेच प्रशासनाने वेळीच चौकशी करणे गरजेचे व नियमभाहय होत असलेले अवैध मुरुम उत्खननाची तात्काळ तहसीलदार मुखेड यांनी कार्यवाही करुन कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे उप.ता.प्रमुख बालाजी पसरगे,राजरतन गुमडे,राहुल इंदुरे,सह अन्य शिवसैनीकातुन होत आहे.


       अवैध उत्खनन होत असल्यास चौकशी व पंचनामा करून अवैध उत्खनन होत असलेले निदर्शनास आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. 
                                                   काशिनाथ पाटील
                                                 तहसीलदार मुखेड