गुजरातमध्ये आजपासून नागरिकत्व संशोधन कायदा लागू – ३५०० हिंदू शरणार्थींचे होणार रिजिस्ट्रेशन

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

गांधीनगर : नागरिकत्व संशोधन कायदा आजपासून गुजरातमध्ये लागू झाला. पाकिस्तानमधून आलेल्या ३५०० हिंदू शरणार्थ्यांना गांधीधाम आणि कच्छ येथे भारताचे नागरिकत्व प्रदान करण्यात येईल. केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया या कार्यक्रमाला हजर राहतील.

नागरिकत्व संशोधन कायद्यांतर्गत शरणार्थी नागरिकांना भारताचे नागरिकत्व देणारे गुजरात हे पहिले राज्य ठरणार आहे.

पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागातून आलेलं हे हिंदू शरणार्थी सध्या कच्छ, मोरबी, राजकोट आणि बनासकांठा येथे रहात आहेत. यातील बहुसंख्य नागरिक सोढा राजपूत समाजाचे आहेत. ते गुजराती भाषिक आहेत. यातील काही लोक १५ – २० वर्षांपासून भारतात रहात आहेत.