दिव्यांगास मारहाण करणाऱ्या रेल्वे पोलीसांवर गुन्हा दाखल करा अन्यथा रेल रोको आंदोलण

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
 मुखेड: पवन कँदरकुंठे
        दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी लढणार्या राहुल साळवे यांना दि 16 डिसेंबर 2019 रोजी अमाणुश मारहाण करणार्या रेल्वे पोलिसांवर अपंग कायद्या अंतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करा अन्यथा कुठल्याहि क्षणी नांदेड रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलण करणार.
          सविस्तर व्रत्त असे की, नांदेड जिल्हाच नव्हे तर समंध महाराष्ट्रात दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी निस्वार्थ लढणारे अल्पदृष्टि दिव्यांग राहुल सिताराम साळवे यांना रेल्वेतील दिव्यांग डब्यात तसेच स्थानक परीसरात होत असलेल्या गैरव्यवहाराबाबत काहि दिव्यांगांचे फोन आल्यामुळे ते दि 16 डिसेंबर 2019 रोजी नांदेड रेल्वे स्थानकात आले असता रेल्वे पोलिसांना सदरील डब्यात आणि परिसरात होत असलेल्या गैरव्यवहाराबाबत जाब विचारला असता नांदेड रेल्वे पोलिसांनी राहुल साळवे यांचा मोबाईल जप्त  करून तसेच अनैसर्गीक अमाणुश कृत्य करून 2 तास काठ्या लाठ्यांनी मारहाण केली या सर्व प्रकरणाचा आम्हि निषेध करतो तसेच या सर्व दोषी रेल्वे पोलिसांवर अपंग सुधारीत कायदा 2016 कलम 92 अंतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करावा.
         अन्यथा कुठलीच पुर्वसुचणा न देता रेल्वे स्थानक नांदेड येथे रेल रोको आंदोलण करून तिव्र बोंबाबोंब आंदोलण करण्यात येईल तसेच हे आंदोलण आपल्या ऊदासिन धोरणाविरूद्ध असल्यामुळे यात काहि अणुचीत प्रकार घडल्यास यास सर्वस्वी रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासनच जबाबदार राहिल याची गंभीर नोंद असावी असे निवेदन देण्यात आले यावेळी पिंटु बद्देवाड,माधव शिरूळे,गजानन इंगोले, ज्ञानेश्वर बेळे,राजेश्री गवलवाड,आमोल इंगोले, नारायण शाहु आदी ऊपस्थीत होते.