नांदेडात आभाविपने केले नागरिकत्व संशोधन कायद्याचे स्वागत

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नागरिकत्व संशोधन कायद्याचे अखिल भारतिय विद्यार्थी परिषदेच्या वतीने प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांच्या उपस्थितीत स्वागत व समर्थन करण्यात आले . संसदेच्या दोन्ही सभागृहात नागरिकत्व संशोधन कायदा पास करण्यात आला परंतु कितेक दिवसापासून घुसखोरी चालु आहे. या घुसखोरी थांबवण्याकरता नागरीकत्व सुधारणा कायदा ( CAA 2019) पारित करण्यात आला.

या कायद्या मुळे सध्या भारतात असलेल्या घुसखोरी करणारे लोक या कायद्या मुळे घुसखोरी पुर्णपणे बंद होईल एवढा मोठा निर्णय घेणाऱ्या सरकारचे अभिनंदन..! यालाच काही लोक स्वतःला थोर विचार वादी समजनारे लोक या विद्येयकला विरोध करत आहेत मुळात हे विधेयक पारित होऊषनये असे तुट पुंजी लोकांची मागणी आहे.

या कायद्याच्या विरोधात जाऊन देशामध्ये अराजकता माजवण्याचे काम काही संघटना करत आहेत आशा संघटनेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आव्हान करते की देशात शांतता नांदावी या साठी सम्पूर्ण लोकांनी सहकार्य करावे.

अर्धवट माहिती घेऊन मोठ्या प्रमाणत हिंसाचार करणे योग्य नाही.राष्ट्र हित लक्षत घेऊन या कायदाला समर्थन करावं असं आवाहन अभाविप करीत आहे.ज्या ज्या वेळी राष्ट्राच्या हिताचे जे विषय येतील त्यावेळी त्या त्या सरकारला मदत केली आहे.