बस आणि टँकरचा भीषण अपघातात एक ठार 25 विद्यार्थी जखमी

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील आजंती येथे सकाळी ७ च्या सुमारास वाढोणा ते नेर जाणाऱ्या एस टी बस आणि टँकरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे वळणावर ही गंभीर दुर्घटना घडली आहे. यात बसमधील एक प्रवासी मृत झाला असून त्याचे नाव अद्याप समोर आले नाही. तर या दुर्घटनेत एस टी चालकाचा पाय चिरडला गेला आहे. तर जवळपास २५ विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे.

नेर ग्रामीण रुग्णालयात येथे या जखमींना भरती केले असून यातील काही गंभीर जखमींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता पाठवले आहे. ऍम्ब्युलन्सची कमतरता असल्याने शिवसैनिकांनी तातडीने खाजगी गाडी करून काही जखमींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात भरती केले आहे. सकाळची गाडी असल्याने या बसमध्ये शिक्षणाकरता जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा भरणा जास्त होता.