नांदेड जिल्ह्यातील उगवतं नेतृत्व संदीप उर्फ सँडी केंद्रे

इतर लेख ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
            सध्या राजकारण म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते राजकारणी आणि त्यांचा राजकीय वारसा घेऊन जन्माला आलेले त्यांचे वारसदार. पण कुठलंही पाठबळ, आधारवड, राजकीय वारसा  नसताना स्वबळावर जिल्ह्यातील युवावर्गाच्या हृदयात स्थान मिळवणार व्यक्तिमत्व म्हणजे संदीप केंद्रे. 

                 खरंतर संदीप केंद्रे हे खरं नाव असलं तरी सर्व जण त्यांना “सँडी” ह्या नावानेच ओळखतात.  अश्या धडाडीच्या व्यक्तिमत्वाचा लेख लिहण्याचं कारण म्हणजे त्यांचा जवळ आलेला वाढदिवस.  मागच्या वाढदिवस म्हणजे च 1 जानेवारी ला त्यांनी दुर्दैवाने घडलेल्या भावाच्या दुःखद घटनेमुळे वाढदिवस रद्द करून वाढदिवस दिनी वही पेन देण्याचं आवाहन केल होत, तरी पण त्यांच्या वर असणाऱ्या प्रेमापोटी मित्रपरिवाराने आपल्या आपल्या भागात त्यांचा वाढदिवस मोठा धूमधडाक्यात साजरा केला होता. ह्या वाढदिवसाची चर्चा पूर्ण जिल्ह्यात झाली होती.


           प्रत्येक गोष्टीची अभ्यासपूर्ण मांडणी, समाजातील प्रत्येक घटकांवर असलेली बारीक नजर, स्पष्ट वक्तेपणा,  कोणालाही आवडेल आणि आपलं करून घेईल अश्या स्वभावामुळे प्रचंड मोठा मित्रपरिवार असल्याने त्यांची राजकीय व्यक्तीसोबत नेहमी उठकबैठक असते.  त्यांची दुसरी ओळख ही “रामदास पाटील समर्थक” अशी आहे.

त्या बद्दल बोलायचं झालं तर संदीप केंद्रे नेहमी म्हणतात “रामदास पाटील साहेबांचा आणि माझा स्वभाव जवळजवळ सारखाच आहे, साहेब नेहमी गरीब विद्यार्थी, अपंग आणि अनाथ व्यक्ती, वृद्ध यांस निःस्वार्थपणे मदत करत असतात, राजकारणात काहीही होवो पण आयुष्यात मला दुसरे रामदास पाटील बनायचं आहे”.

                    उन्हाळ्यात पाणपोई, हिवाळ्यात गरिबांना चादरी वाटप असो किंवा मग मित्रपरिवाराचा वाढदिवस, आनंदी सन असो हे नेहमी समाजातील दुर्बल आणि दुर्लक्षित घटकांमध्ये जाऊन साजरे करायचे आणि त्यामधून भेटणारे आशीर्वाद, प्रेम हेच नाव कमावलेल्या यशाचं गूढ आहे असं ते आवर्जून सांगतात. लोकं हसले, लोकांनी नाव बदनाम

करायचे खूप प्रयत्न केले पण म्हणतात ना “ध्येय गाठणारे लोकं कोणत्याही परिस्थितीमध्ये ध्येय गाठतातच”.


          अश्या ह्या अभ्यासू, जिन्यासु, जिल्ह्यातील राजकारणातील उगवतं नेतृत्व, दिलखुलास भावमुद्रा असणाऱ्या आणि राजकारणात वायुवेगाने उभरत असलेला तेजस्वी ध्रुवतारा समाजसेवक संदीप केंद्रे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.  


               प्रा.दशरथ मुंडे 
                 हदगांव.