प्रा.डॉ. रामकृष्ण बदने यांना मराठवाडा भूषण पुरस्कार प्रदान ..”आई” कार म्हणून महाराष्ट्राला ओळख

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
  मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड
           ग्रामीण (कला,वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जी. नांदेड येथील माजी प्राचार्य डॉ. रामकृष्ण बदने यांना वनिता विकास बहुउद्देशीय महिला मंडळ नांदेड चा मराठवाडा भूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
    प्रा. डॉ. बदने यांना यापुर्वी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील अध्यापना बरोबरच संशोधन क्षेत्रातही त्यांनी उत्तुंग असे कार्य केले आहे.
         त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत सात विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी)ही पदवी प्राप्त झाली आहे. विविध वृत्तपत्रातून विविध विषयावरती ते वेळोवेळी लेखन करीत असतात. प्राचार्य म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले आहे. उत्कृष्ट वक्ते व प्रवचनकार म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे.
          विविध शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक चळवळीमध्ये ते अग्रेसर असतात. आईकार म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. त्यांच्या वरील कार्याची दखल घेऊन त्यांना मुंबई हिंदी विद्यापीठ मुंबईचे कुलगुरू डॉ बलदेव सिंह चौहाण,प्रा. डॉ. अरुणा शुक्ल व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार नांदेड येथे नुकताच प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील त्यांचे मित्र, विद्यार्थी, आप्तेष्टांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.