खंडणीचा गुन्हा दाखल होताच खंडणी बहाद्दरास चोविस तासात अटक; मुखेड पोलिसांची कार्यवाही

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड शहरातील हॉटेल आराम बार अँड रेस्टाँरंट येथे येऊन प्रतिमहा तीन हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्यास दि १२ रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर दि १३ रोजी चोविस तासाच्या आत अटक करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहराच्या मध्यभागी आराम हॉटेल असुन फिर्यादी श्रीकांत गरुडकर वय 34 वर्ष रा. मुखेड यांच्या म्हणण्यानुसार आरोपी नदीम शेख वय 29 वर्ष, रा. मुखेड हा दि. 10 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 4.15 वाजता हॉटेलमध्ये येऊन प्रतिमहा तीन हजार रुपयाची खंडणी मागणी केला त्यास देण्यास नकार दिला असता हॉटेलमधील नौकरास लाथाबुक्याने मारहाण केली व हॉटेल मधील काचेचे ग्लास, फायबर खुच्र्या असे सामानाची तोडफोड करुन जवळील चाकुन काढून धमकी दिली व दहशत तयार केली.
           याबाबत मुखेड पोलिसात फिर्यादीच्या फिर्यादीवरुन गुन्हा रजि.न. 369/19 कलम 386,323 व 427 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तर गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ सुत्र हलवून आरोपीस दि. 13 रोजी सायंकाळी 5.25 वाजता अटक करुन पोलीस कोठडीत रवानगी केली.
             या प्रकरणात पोलीस उप विभागीय अधिकारी रमेश सरवदे यांनी मुखेड पोलीस स्टेशनला भेट दिली तर याचा तपास मुखेड पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणपत चित्ते हे करीत आहेत.