मुखेड तहसीलच्या पुरवठा विभागात शिधापत्रिका नसल्याने कार्डधारकांची गैरसोय

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
* सहा महिण्यापासुन तुटवडा
* रोज 25 ते 30 कार्डाची मागणी
* सहा महिण्यात केवळ 100 कार्डच आले

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड तहसिल कार्यालयात शिधापित्रकांचा मागील सहा महिण्यापासुन तुटवडा पडला असुन रोजच्या रोज शिधापत्रिकेच्या मागणी पाहता कार्डधारकांची गैरसोय होत असल्याचे चित्र सध्या तहसिल कार्यालयात दिसुन येत आहे.

तालुक्यात अंत्योदय, प्राधान्य कुटूंब व शेतकरी अशा योजनेतील 55 हजार कार्डधारक असुन तर सरकारी कर्मचारी सुध्दा शुभ्र शिधापत्रिकेत आहेत. मागील सहा महिण्यापासुन तहसिल कार्यालयात वरीष्ठ कार्यालयात शिधात्रिका आली नसल्याने येथील नागरीकांचे आर्थिक, शारीरीक व मानसीक त्रास सुध्दा होत आहे.

            तालुका भौगोलिक दृष्टया मोठा असुन मुक्रमाबाद भागातून 50 ते 60 कि.मी. प्रवास करुन नागरीक तहसिलला येत असतात. कोणाचे वैद्यकिय काम असते तर कुणाचे शिक्षणासाठी शिधापित्रका आवश्यक असते तर कोणी जीवण – मरणाच्या फे-यात दवाखाण्यात मृत्यूशी झुंझ देत राहतो त्यासाठी दवाखाण्यात शिधापत्रिकेची अत्यंत आवश्यकता असताना शिधापत्रिका मिळत नाही यामुळे नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
          तहसिल कार्यालयाकडुन संबंधीत वरीष्ठ कार्यालयात तीन वेळेस मागणी करुनही वरीष्ठ कार्यालयाकडुन कुठलीच दखल घेत नसल्याचे दिसुन येत असुन वरीष्ठ कार्यालयाने शिधापत्रिकेच्या पुरवठयाबाबत दखल घेत नसल्याने प्रशासन किती थंड काम करीत आहे हे यावरुन दिसून येत आहे.

     रोज येणाऱ्या अर्जावरुन शिधापत्रिकेची मागणी लक्षात घेता वरीष्ठ स्तरावर मागणी केली असुन शिधापित्रका प्राप्त होताच कार्डधारकांना व आलेल्या अर्जदारांना शिधापत्रिका देण्यात येतील.
                                               आर. आर. पदमवार
                                    नायब तहसिलदार, पुरवठा विभाग, मुखेड