मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शिवनेरी गडावरून करू शकतात कर्जमाफीची घोषणा !

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शिवनेरी गडावर जाणार असून यावेळी सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असणाऱ्या शिवनेरी गडावरुन उद्धव ठाकरे सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा करु शकतात असे संकेत आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाचा दौरा आहे. याशिवाय उद्धव ठाकरे एकवीरा देवीच्या दर्शनालाही जाणार आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीच्या महत्त्वाकांक्षी सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी सुमारे ६० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी लागणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारलाही हा निधी कर्जरूपानेच उभारावा लागणार असल्याने सुमारे पावणेपाच लाख कोटी रुपये कर्जाचा बोजा मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे.