घनकचरा व्यवस्थापनाच्या गुत्तेदाराचे कंत्राट रद्द करावे – नगरसेविका कोत्तापल्ले

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
 स्वच्छतेचे कामे निकृष्ठ दर्जाचे व कामात मनमानी करत असल्याने केली मागणी

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

शहरातील प्रभागात घनकचरा व्यवस्थानाविषयीचे कामे व्यवस्थित व स्वच्छ होत नसल्याने घनकचरा व्यवस्थापनाच्या गुत्तेदाराचे कंत्राट रद्द करावे अशी मागणी नगरसेविका सौ. रंजना कोत्तापल्ले यांनी मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांच्याकडे दि ०५ रोजी निवेदनाव्दारे केली आहे.

शहरातील प्रत्येक वार्डातील घरोघरी जाऊन घनकचरा व्यवस्थापना अंतर्गंत ओला व सुका कचरा विलीनीकरण करुन डंपिंग ग्राऊंड येथे टाकावयाचे आहे. परंतु गेल्या काही महिण्यापासुन सदरील वाहने त्याच्या मर्जीने चार ते पाच दिवसात एक वेळेस कुठलेही बंधन न पाळता मनमानी पध्दतीने होत आहे.

सदरील वाहनावर जीपीएस यंत्रणा बसविलेली नाही व तेथील वार्डात जायाचे वेळापत्रक नाही. नाल्या तुडुंब भरुन आहेत. डासाचे साम्राज्य वाढलेले आहे त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात येऊन डेंग्यु होण्यासारखे वातावरण निर्मित झाले आहे तर अनेकांना डेंग्युचे लक्षण सुध्दा दिसत आहे.

तसेच शहरातील मटन मार्केट मधील कोंबडयाचे पंख जमा करुन डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यासाठी असलेले वेगळे वाहन निदर्शनास येत नाही. तसेच सदरील घनकचरा व्यवस्थापनाचे नागरीकांना तक्रारी देण्याकरीता व तसेच नगरसेवकांना सुध्दा तक्रारी देण्याकरीता संबंधीत कंत्राटदाराचे कुठल्याही यंत्रनेचे कार्यालय शहरात नाही.

अशा मनमानी कारभार करणाऱ्या व जनतेच्या आरोग्याला वेठीस धरणा­ऱ्या कंत्राटदारचे बिल अदा करु नये व त्याचे सदरील कंत्राट रद्द करावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा ही या निवेदनातुन दिला आहे.