कामजळगा येथील जिल्हा परिषद शाळेत  बालकसभा संपन्न

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड  : ज्ञानेश्वर डोईजड
थोर समाजसुधारक स्त्री शिक्षणाचे जनक  क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या  पुण्यतिथीच्या अनुषंगाने व भारतरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब अांबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त कामजळगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोन्ही महापुरूषांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले व त्यानंतर आयोजित करण्यात आलेली विद्यार्थ्यांची बालकसभा उत्साहात संपन्न झाली
      कार्यक्रमाची सुरुवात महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु.वैशाली मठपती तर प्रमुख पाहुणे म्हणून महादेवी एकाळे, धम्मकन्या कांबळे, रोहिणी बिरादार, दिक्षा कांबळे, सतिष धनुरे, शिवानी देवकत्ते उपस्थित होते अध्यक्षा व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते डाॅ बाबासाहेब अांबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात अाले कार्यक्रमाच्या सुरुवातीस  दिक्षा कांबळे व संचाने स्वागतगीत सादर करुन उपस्थितांचे स्वागत केले याप्रसंगी महामानवांच्या जीवनावर अनेक विद्यार्थ्यानी विचार व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप वैशाली मठपती हिने केले तर. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन शिवभक्ती जळकोटे व दिक्षा मठपती या विद्यार्थ्यांनीने केले तर महादेवी एकाळे हिने उपस्थितांचे अाभार मानले  यावेळी मुख्याध्यापक जि.आर.कोसंबे,  प्रा.एन.जे सोनटक्के, जि.पी.जाधव, एन.बी.मठपती, एस.एम.हाळदेकर, के.पी.पडोळे, एन.बी.मुसांडे,  सौ.एल.जी.घाटे, सौ.एस.बी.भालेराव सह शाळेतील शिक्षक, शिक्षिका त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ब्रम्हानंद पाटील,अंगणवाडी कार्यकर्ती सौ.पंचशिला कांबळे यांच्यासह गावातील नागरिक व विध्यार्थी उपस्थित होते