आयुष्यमान भारत योजनेचा सर्व्हे पुन्हा करा – मागणी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

       अनेकांची नावे यादीतून वगळल्याने नागरिकात संभ्रम

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
           तालुक्यातील अनेक नागरिकांची नावे  आयुष्यमान भारत योजनेच्या यादीत आले नसून यामुळे अनेक गोर गरीब नागरिक या योजनेपासून वंचित आहे तर गोर बंजारा समाज सुद्धा या पासून वंचित राहिलेला आहे यामुळे आयुष्यमान योजनेचा सर्व्हे पुन्हा करा अशी मागणी दि ०७ रोजी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे  करण्यात आली
          बंजारा समाज भटक्या विमुक्त जातीमध्ये मोडला जातो गोर – बंजारा समाज भटकंती करून आपली उपजीविका भागवितात तर सहा महिने घरदार सोडून बाहेरगावी सुद्धा कामाला किंवा ऊसतोडीला जात असतो.  त्यामुळे सामाजिक आर्थिक जातीय जणगणना 2011 च्या जनगणनेनुसार नोंद झालेली नसून पिंपळकुंठा ग्रामपंचायती अंतर्गत मानसिंग तांडा, किसान तांडा, लालसिंग तांडा येथील उपेक्षित लोकांचे आयुष्यमान भारत योजनेच्या यादीत एकाही व्यक्तीचे नाव आढळून आले नाही तसेच वसूर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या वसूर तांड्यातील अनेक गोरगरिबांची नावे या यादीत आढळून आलेले नाहीत त्यामुळे सर्व सामान्य जनता या  योजनेपासून वंचित राहिली असून हा जनतेवर झालेला खुप मोठा अन्याय आहे.
       त्यामुळे गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यमान भारत योजनेचा पुन्हा सर्व्हे करण्यात यावा यासाठी गोर सेनेचे मुखेड तालुका उपाध्यक्ष वसंत बालाजी जाधव व संघटक बबलू चव्हाण यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.