भाजपाचे …१२ आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत ?

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

राज्यातून  भाजपा सरकार जातात भाजपाचे १२ आमदार आणि राज्यसभेतील खासदार लवकरच स्वगृही म्हणजेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भातील माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच दिल्याचे वृत्त ‘द इकमॉनिक टाइम्स’ने दिले आहे.

विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले नेते पुन्हा जाण्याच्या तयारीत आहेत. इतकच नाही तर भाजपामधील काही नाराज नेतेही इतर पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्तामध्ये म्हटलं आहे.

महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध करताना भाजपाने सभात्याग केल्यावर टोला लगावताना महाविकास आघाडीच्या एका नेत्याने ‘भाजपामध्ये आमचे अनेक छुपे मित्र आहेत. त्यामुळेच फडणवीस यांनी बहुमत चाचणीदरम्यान आपली ताकद दाखवण्याऐवजी सभागृह सोडणे पसंत केले,’ असे मत व्यक्त केले आहे.