महिलेच्या तक्रारीवरुन मुखेडात अॅॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
मुखेड तालुक्यातील उंद्री पदे येथील पीडीत महिलेच्या तक्रारीवरुन मुखेड पोलिसात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दि. 03 रोजी दाखल झाला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुखेड तालुक्यातील उंद्री प दे शेजारील असलेला खोरी तांडा येथाील आरोपी भारत किशन चव्हाण वय 40 वर्ष हा पैशाच्या जुन्या देवाण घेवाणीतुन आरोपी पीडीत विधवा महिलेच्या घरी जाऊन पैशाची मागणी करत जातीवाचक शिविगाळ केली.

                 तेंव्हा पीडीत महिलेले मुखेड पोलिस स्टेशन गाठून आरोपी भारत चव्हाण याच्या विरुध्द फिर्याद दि. 03 रोजी रात्रीच्या सुमारास दिली असता उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे, पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर, पोलिस उपनिरीक्षक मिथुनकुमार सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन मुखेड पोलिसात कलम 354 ब , कलम 323,452, 504 व 506 भा.दं.वि. अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन मुखेड दिवाणी न्यायालयात हजर केले असता आरोपीस दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असुन याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे हे करीत आहेत.