विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहीया यांची वार्षिक तपासणीसाठी मुखेड पोलिस स्टेशनला भेट

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड पोलिस स्टेशनच्या वार्षिक तपासणीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहीया यांची व नांदेड पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी मुखेड पोलिस स्टेशनला दि. 03 रोजी येवून वार्षिक तपासणी केली.

या तपासणीमध्ये मुखेड पोलिस स्टेशनचे अभिलखे, गुन्हे व तपास , तंटामुक्त समित्याचे कार्य, महत्वाची कागदपत्रे ईत्यादी फाईलींची तपासणी करुन आढावा घेण्यात आला. या वार्षिक तपासणी दरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचा­ऱ्यांंची विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहीया यांनी बैठक घेऊन मोठ्या गुन्ह्यात तपासणी कशी करावी , आरोपीस कसे पकडावे, पिडीत महिलांची तात्काळ तक्रार नोंदविणे अशा विविध बाबीवर  मार्गदर्शन करुन योग्य त्या सुचना दिल्या तर जनतेचे पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

तत्पुर्वी मुखेड पोलिस पाटील संघटनेच्या वतीेने विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहीया व व नांदेड पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश सरवदे यांचा सत्कार करण्यात आला व पोलिस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान कराळे यांनी पोलिस पाटलांच्या अडीअडचणी समोर मांडल्या.

या वार्षिक तपासणी मध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहीया, नांदेड पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश सरवदे, मुखेड पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब मगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज गायकवाड,पोउनि गणपत चित्ते, मिथुनकुमार सावंत, अनिता ईटूबोने,  मुखेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्यासह देगलुर, मुक्रमाबाद, मरखेल येथील पोलिस अधिकारीही उपस्थित होते. दरम्यान या तपासणीवेळी मुखेड पोलीस स्टेशनची सुसज्ज इमारत व योग्य काम पाहता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी समाधान व्यक्त केल्याचे समजते.