हैद्राबाद येथील डॉ. रेड्डी प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा द्या – गुमडे राजरत्न

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
बा-हाळी – पवन कँदरकुंठे
  हैद्राबाद येथील डॉ.प्रियंका रेड्डी या युवतीवर सामुहिक बलात्कार करुन त्याची हत्या केल्याचा निषेधार्थ जय लहुजी सामाजिक संस्थेच्या वतीने मुक्रमाबाद पोलीस ठाणे येथे निवेदन देऊन या प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जय लहुजी सामाजिक संस्थेचे मुखेड तालुका अध्यक्ष श्री.राजरत्न गुमडे यांनी पोलीस निरीक्षक गड्डीमे  यांच्याकडे केली
                 हैदराबाद येथील पशू वैद्य चिकीत्सक डॉ.प्रियंका रेड्डी या युवतीवर काही नराधमांनी सामुहिक बलात्कार करुन, तिची हत्या केली. तर सदर युवतीच्या प्रेतास जाळण्यात आले. घडलेला हा प्रकार संपुर्ण मानव जातीस काळिमा फासणारा आहे. आजही महिला व मुली सुरक्षित नसल्याचे या घटनेवरुन अधोरेखित होत आहे. निर्भया नंतर असे प्रकार सातत्याने घडत असून, महिलांवर बलात्कार करणार्‍या नराधमांचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जय लहुजी सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
               तसेच शहरासह जिल्ह्यात देखील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न भेडसावत असून, अनेक ठिकाणी महिलांची छेडछाडीचे प्रकरण समोर येत आहे. अशा घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यात होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने महिलांच्या सुरक्षिततेबाबत ठोस पावले उचलण्यात यावे. तसेच नांदेड प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करुन सामाजिक उपक्रमाद्वारे जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्याचे सुद्धा या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
             यावेळी  जय लहुजी सामाजिक संस्थेचे मुखेड तालुका अध्यक्ष श्री.राजरत्न गुमडे जय लहुजी सामाजिक संस्थेचे नवी मुंबई अध्यक्ष कु.योगेश अभंग शिंदे साहेब  व युवासेना उपतालुका प्रमुख मुखेड श्री.अतुल सुनेवाड , जय लहुजी सामाजिक संस्थेचे मुक्रमाबादचे शहर अध्यक्ष श्री.शशी नवाडे  , युवा समाजसेवक श्री.मस्तान तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.