शेतकऱ्यांनी रब्बीचा पीकविमा भरून घ्यावा- पाटील

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / प्रतिनिधी
राज्यात रब्बीचा प्रधानमंत्री पीकविमा योजना सहा पिकांसाठी लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा आणि कांद्यासाठी ३१ डिसेंबर तर भात आणि भुईमुगासाठी एक एप्रिल ही अंतिम मुदत राहील.

कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी आपल्या बॅंक खात्यातून विविध कार्यकारी सोसायटीकडे,बॅंकेत,आपले सेवा केंद्रात किंवा विमा प्रतिनिधीमार्फत विमा हप्ता जमा करू शकतील.

शेतकरी या रब्बी प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी मुद्दतीमध्ये व ठरवून दिलेल्या पिकांवर विमा भरून या रब्बी प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान युवा रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे.