आमदार-मंत्री-क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका ती रक्कम शेतकऱ्यांना द्या – बच्चू कडू

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने काल बहुमत सिद्ध केले. त्यानंतर आज विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात आली. भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 

त्यामुळे सभागृहात अभिनंदनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी सभागृहाचे नेते म्हणून विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंचे अभिनंदन केले. तसेच आमदार, मंत्री, आणि क्लास वन अधिकाऱ्यांना सहा महिने पगार देऊ नका, ती सर्व मदत शेतकऱ्यांना द्या अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी यावेळी केली.