पंधराव्या वित्त आयोगातील पंचवार्षिक योजनेत होणार गावांचा विकास : पंस सदस्य पंढरी कांबळे

Uncategorized नांदेड जिल्हा मुखेड राष्ट्रीय
बा-हाळी प्रतिनिधी:- पवन कँदरकुंठे
              जिल्हा परिषद, नांदेड,यशदा पुणे व पंचायत समिती मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आमचं गाव आमचा विकास (GPDP) अंतर्गत पंचवार्षिक आराखडा निमित्त आज गुंडोपंत दापका येथे गणस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रथमतः या सभेला सुरूवात करताना महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करून ही सभा आयोजित करण्यात आली.

           या अगोदर ग्रामपंचायत ला निधी येत असताना शासनाने आपल्याला योजना द्यायच्या व आपण त्या योजनेचा लाभ घ्यायचा. पण अता अस न होता शासनाने आपल्या गावातील समस्या काय आहेत व आपल्याला शासन दरबारी योजना कोणत्या मागायचे आहेत हे शासनाने आता आपल्याला कडे सोपवले आहे. त्यामुळे आपण आपल्या गावातील ग्रामसभेत आपल्या गावातील समस्या मांडुन प्रत्येक सरपंचांनी, ग्रामसेवकांनी, गावातील युवक वर्गांनी, ज्येष्ठ महिला,अपंग, व्रद्ध या सर्व घटकांनी एकत्र येऊन गावाचा आराखडा तयार करून पंधराव्या वित्त आयोगानुसार जसा निधी खेचून आणता येईल व आपल्या गावाचा चेहरामोहरा बदलता येईल त्या तेवढे प्रयत्न करावेत. गावाचा विकास म्हणजे आपल्या देशाचा विकास होय.  ज्या नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी जागा नाही त्या नागरिकांना  गावातील ग्रामपंचायतीच्या जागेत लोकांनी अतिक्रमण केले त्या जागेतील त्यांचं अतिक्रमण हटवुन त्या जागी त्या नागरिकांना शौचालय बांधून द्यावे.  येत्या ३१ मार्च २०२० ला १४ वा वित्त आयोग संपत असुन १५ वा वित्त आयोग १ एप्रिल २०२० पासुन चालू होणार आहे. तरी आपल्या गावपातळीवरून जसे विकास कामे आणता येईल ते प्रयत्न आपल्या स्तरावरून  करावेत असे पंचायत समितीचे सदस्य पंढरी कांबळे म्हणाले .


           आपलं गाव आपला विकास या पुस्तकाचे प्रकाशन पंचायत समितीचे सदस्य पंडरी कांबळे यांनी केले. तर महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला महिला वर्गांची उपस्थीती मोठ्या प्रमाणात होती.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान व्यंकटराव पाटील दापकेकर यांनी स्वीकारले तर सुत्रसंचलन संगमवाडी चे मुख्याध्यापक शिवुरकर व्हि.पी. यांनी केले. 
तर संपर्क अधिकारी अहिरे , गुंडोपंत दापक्याचे सरपंच सुभाष राठोड, ज्ञानोबा पाटील दापकेकर, पांडव मुंगनाळे सर,गवळी साहेब, मुंडे साहेब,रेणकुंटवार,पवन कँदरकुंठे,सागर कँदरकुंठे, ग्रामसेवीका अर्धी अंबुरे व दापका सर्कल मधील सर्व सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ती,आशा कार्यकर्ती आदि उपस्थित होते.