महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात असू शकतात हे ” चेहरे “

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण

कॉंग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठींबा देत उद्धव ठाकरेंना नेतृत्व म्हणून स्विकारले आहे. उद्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच आता महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळातील काही संभाव्य मंत्र्यांची ही नाव समोर आली आहेत.

यामध्ये राष्ट्रवादीच्या १० तर कॉंग्रेसच्या १० आणि शिवसेनेच्या ११ नेत्यांची आणि घटक पक्षातील 2 नेत्यांची नावं आहेत. तसेच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दोन नेते शपथ घेतील. उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सध्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांची नावे चर्चेत आहेत.

राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, नवाब मलिक, राजेश टोपे, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आदि नेत्यांची नावं चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, के सी पाडवी, विश्वजित कदम, सुनील केदार, नितीन राऊत किंवा नाना पटोले, वर्षा गायकवाड ही नावं आघाडीवर आहेत.

शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, गोपीकिशन बाजोरिया, सुनील प्रभू, अनिल परब, उदय सामंत, दीपक केसरकर, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, संजय राठोड, आशिष जायस्वाल, या नेत्यांना संधी देणार आहे. तर बच्चू कडू (प्रहार) आणि राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना) यांनाही मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता आहे.