सावरगांव पि. येथील पुतळामाता प्रा. शाळेत भारतीय संविधान  दिन साजरा

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड तालुक्यातील सावरगांव पि. येथील पुतळामाता प्राथमिक शाळेत भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधान ग्रंथाचे पुजन संचालक माधव राठोड व मुख्याध्यापक डी.के. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

                  शाळेतील शिक्षक प्रताप चौधरी यांनी विद्याथ्र्याना डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानावर सखोल मार्गदर्शन केले तसेच भारतीय संविधान व उद्देशीकेचे वाचन विद्याथ्र्यांनी केले व शाळेत संविधान विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.

                 यावेळी संस्थेचे संचालक माधव राठोड, मुख्याध्यापक डि.के. चव्हाण, शिक्षक  प्रताप चौधरी, बालाजी पाटील, रघुनाथ राठोड, व्यंकट वारे,  प्रकाश भत्ते, आयुब खान पठाण, सौ. छाया कबिर, संचिवनी नायके,सेवक विठठल डुमणे आदी कार्यक्रमास उपस्थित होते.