२०१८ चे दुष्काळी अनुदान जुन्या यादीनुसार अनुदान द्या; अन्यथा आंदोलन…वळंकी येथील गावकऱ्यांंचा इशारा

Uncategorized ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
बाराहाळी प्रतिनिधी:- पवन कँदरकुंठे
        मुखेड तालुक्यातील वळंकी येथील २०१८ चे दुष्काळी अनुदान ग्रामपंचायत मध्ये लावण्यात आलेल्या यादीनुसार नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक (शाखा मुक्रमाबाद) ही देत नसुन तहसील कार्यालयामार्फत बँकेस दिलेल्या यादीत व ग्रामपंचायत मध्ये लावलेल्या यादीत मोठी तफावत असुन प्रत्येकी शेतकऱ्यांस साधारण ३०० ते १००० रूपयापय्रंत नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतला लावण्यात आलेल्या यादीप्रमाणे शेतकऱ्यांस अनुदान वाटप करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा वळंकी येथील युवकांनी दिला आहे .
            वळंकी येथील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही. लाभापासून वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांस तात्काळ लाभ मिळुन देण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रशासनास सुचना कराव्यात. गावातील तलाठी हे शेतकऱ्यांस फेर लावण्यासाठी मध्यस्थी व्यक्ती ठेवून आर्थिक व्यवहार करत असल्याने शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक होत असुन यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तरी तहसिलदार यांनी तातडीने
प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी दि.२५ नोव्हेंबर रोजी सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने तहसीलदार काशिनाथ पाटील यांना देण्यात आला.
            यावेळी वळंकी गावातील किशोर कँदरकुंठे,प्रकाश बिरादार,सागर कँदरकुंठे,भीम बिरादार, पवन कँदरकुंठे आदी गावकरी ऊपस्थीत होते.