जि.प.प्रा.शा.कामजळगा येथे  जि.प. सदस्या सौ.सुगावकर यांच्या हस्ते        विद्यार्थ्यांना आयरॉन गोळयाचे वाटप 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड
              मुखेड तालुक्यातील सावरगाव(पी) च्या जि.प.गटाच्या सदस्या तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.गंगासागर विजय पाटील यांच्या हस्ते जि.प.प्रा.शा.कामजळगा येथे आरोग्य विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना आयरॉन व फोलिक अॅॅसिड व फेरस सल्फेट च्या गोळयाचे वाटप करण्यात आले
             यावेळी बालाजी पाटील सुगावकर,सौ.शुभांगी पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ब्रम्हानंद पाटील बिरादार,शिवशंकर पाटील कवठेकर,शाळेचे मुख्याध्यापक कोसंबे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
             विद्यार्थ्यांना गोळ्यावाटपानंतर शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकातून सोनटक्के सरांनी जि.प.सदस्या सौ.पाटील यांच्याकडे शाळेतील सर्व विद्यार्थ्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी प्युअर केंट फिल्टर यंत्राची मागणी केली व शाळेच्या शैक्षणिक सद्यस्थितीवर प्रकाश टाकला.
           शाळा डिजिटल होत असून शाळेची स्वच्छता व नियोजनाबद्यल सौ.गंगासागर पाटील मॅडम यांनी समाधान व्यक्त करुन प्युवर फिल्टर केंट यंत्रणेची मागणी दोन महिण्यात पूर्ण करण्यात येईल असे सांगून पुढील शैक्षणिक कार्यासाठी सर्व शिक्षक बांधव व भगिणी यांना शुभेच्छा दिल्या. शेवटी शाळेच्या वतीने जाधव सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.