मराठवाड्यातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शेतकरी व कष्टकरी चळवळीतील अनेक नेते व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आयुक्तांकडे केल्या मागण्या

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा राष्ट्रीय

 

*बा-हाळी प्रतिनिधी: पवन कँदरकुंठे*

मराठवाड्यातील सुमारे ४४ लाख हेक्टर पेक्षा क्षेत्र हे आँक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील अवेळी झालेल्या पाऊस व अतीव्रष्टीमुळे नुकसान ग्रस्त झालेले आहे.यामध्ये खरीप १९ हंगामातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे आणी काढणीपश्चात देखील प्रचंड नुकसान झालेले आहे. मात्र सदर विमा कंपन्या शासन निर्णयातील तरतुदी नुसार शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई अदा करण्यास नकार देत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तिव्र असंतोष निर्माण झाला आहे.

त्यामुळे आमच्या खालील मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी शेतकरी कार्यकर्त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले.

१) पिक विमा योजनेतील खरीप २०१९ चे सोयाबीन पिक कापणी प्रयोग तात्काळ रद्द करावे. २५% जास्त बाधीत क्षेत्र असल्याने सरसकट संपूर्ण पिक विमा भरपाई सरसकट अदा करण्याची जिल्हास्तरीय अधिसूचना तात्काळ जारी करावी.

२)बे मौसमी पाऊस आणि अतिवृष्टीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सोयाबीन, कापुस,तुर,बाजरी मका या पिकांची संपूर्ण विमा जोखीम रक्कम म्हणजे सोयाबीन साठी ४३००० रूपये प्रति हेक्टर तात्काळ अदा करण्याचे विमा कंपन्यांना आदेश द्या. यामध्ये काढणीपश्चात नुकसान झालेल्या

३) पिक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना विमा धारका इतकीच म्हणजे सोयाबीन साठी ४३००० रू प्रती हेक्टर शासकीय मदत करा. केंद्र शासनाने आपत्ती निकष रद्दबादल करून राज्य शासनाने स्वतंत्र आपत्ती कोश यातुन मदत करा.

४) खरीप २०१८ मधील जिंतुर गंगाखेड आणी पुर्णा तालुक्यातील ९ महसूल मंडळात व संपूर्ण जिल्ह्यात थकीत दुष्काळी अनुदान तात्काळ अदा करा.

५)भुमीहीन आणी बटाईदार यांना प्रत्येक कुटुंबास ५० हजार रूपये खावटी द्या.

६) अतिवृष्टीग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांची संपूर्ण परिक्षा फीस आणी शैक्षणिक शुल्क संपूर्ण माफ करा.

७) परभणी जिल्ह्यात प्रत्येक बाजार समिती क्षेत्रात काँटन काँर्पोरेशन आँफ इंडीया द्वारे खरेदी सुरू करा.

८) सर्व प्रकारच्या कर्ज फायनान्स आणी कर याच्या वसुलीस तात्काळ स्थगिती द्या.

९)विणाशर्त व संपूर्ण कर्जमाफी अमलात आणा.

१०) सिद्धेश्वर-येलदरी,लोअर, दुधना, माजलगाव प्रकल्प या धरणांमधील पाण्याचे रब्बी आणि उन्हाळी पिकासाठी पाणी पाळ्या जाहीर करा.

*नांदेड जिल्ह्यातील लेंडी प्रकल्प येथील धरणग्रस्तांचा मावेजा अदा करून तात्काळ धरण पूर्ण करा व सिंचन अनुशेष दूर करा*.

इत्यादी प्रश्नांबाबत दि.२२ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात मा. विजयकुमार फड यांना निवेदन देऊन हे प्रश्न तात्काळ मार्गी लावाव्यात असे निवेदन देण्यात आले

यावेळी पीकविमा व शेती प्रश्नाचे अभ्यासक किसान सभेचे काँ. राजन क्षीरसागर, राजीव पाटील, डाँ. उद्धव घोडके, शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर, रयत क्रांती संघटनेचे शिवशंकर पाटील कलंबरकर, मित्र अँड अविनाश सुर्यवंशी, अँड सुरेश पिडगेवर, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे माणिकराव कदम, सभांजी ब्रिगेड परभणी जिल्हाध्यक्ष शिवाजी कदम, राजाभाऊ देशमुख, चांदभाई मुन्नीवाले व मराठवाड्यातील अनेक जण उपस्थित होते.