मुखेडात भाजपाच्या वतीने साखर वाटुन व फटाके फोडुन जल्लोष

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा – राष्ट्रवादी पक्षाचे सरकार स्थापन केल्याने व पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्याने मुखेडात भाजपाच्या वतीने दि. 23 रोजी विरभद्र मंदीर येथे आरती करुन साखर वाटप करण्यात आली व फटाके फोडुन जल्लोष करण्यात आला.

शहरातील मुख्य रस्त्यावररुन रॅली काढत तेलीपेठ मारोती मंदीर व बसस्थानक चौकात फटाके फोडले व भारत माता की जय व नरेंद्र मोदीजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हेै च्या घोषणा यावेळी देण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणिस माधवअण्णा साठे, भाजपा विस्तारक शेखर पाटील,सुरेश उत्तरवार, शिवाजी खतगांवकर, किशोरसिंह चौहान, राम सावळेश्वर, संजय वाघमारे, भाजपा शहर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर डोईजड,  राजेश भागवतकर,नंदु काचावार, विनोद रोडगे,नामदेव यलकटवार, भुरे, शंकर नाईनवाड, चरणसिंह चौहाण, भगवान गुंडावार, गिरीश देशपांडे, प्रमोद मदारीवाले, नामदेव श्रीमंगले, संदिपभाऊ पोफळे, बबन ठाकुर यांच्यासह आदी उपस्थित होते.