महाराष्ट्रातील सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक : पूनम महाजन

ठळक घडामोडी राजकारण

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे.राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना तसेच शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचं सरकार स्थापन होणार असताना आज राज्यात भल्या पहाटे राजकीय भूकंप झाला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. फडणवीस यांच्यासोबतच आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात राज्यपालांनी फडणवीस व अजित पवार यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे.या घडामोडीनंतर विविध प्रतिक्रिया येत असून हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक आहे, असं मत भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी व्यक्त केलं.
तर दुसऱ्या बाजूला ‘भाजपला जाऊन मिळालेल्या अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अपमान केला आहे. त्यांनी शरद पवारांना दगा दिला आहेच, पण महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अजित पवार हे आयुष्यभर तडफडत राहतील,’ असा घणाघात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.