बँकांचा मनमानी कारभार – शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर रक्कम कपात.. मनमानी कारभाराविरोधात कार्यवाही करण्याची मागणी 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

* शेतकऱ्याची दैना सुरूच…

* तालुक्यात शासकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
            शेतकरी संकटात असतांना,शेतकऱ्यांच्या खात्यातून त्यांना न विचारता पिककर्जाचे पैसे बँका परस्पर कापून घेत आहेत. याबाबत बँकांवर कार्यवाही करण्यात यावी,यासाठी दि २१ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयास सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
               शेतकऱ्यांचे पिककर्जाचे पैसे बँका,शेतकऱ्यांना न विचारता त्यांच्या बँकेतील इतर खात्यातून(पिककर्ज खाते सोडून) परस्पर कापून घेत आहेत.आज शेतकरी संकटात आहे.बँका शेतकऱ्यांचे बँकेतील कर्ज शेतकऱ्यांना न विचारता त्यांच्या इतर बँकेतील व्यवहार खात्यातून,शेतकऱ्यांना न विचारता परस्पर कापून घेत आहेत.
            उच्च प्रशासनाने बॅंकांना शेतकऱ्यांच्या परस्पर पिककर्जाचे पैसे कापून घेऊ नये असे आदेश दिले आहेत.तरीपण बँकांनी शेतकऱ्यांना वेठीस धरून हा व्यवहार परस्पर करत आहेत तर मुखेड व मुक्रमाबाद एसबीआय  बँकेकडून  ज्यास्तीच्या तक्रारी आहेत.
            तालुक्यातील सर्वच बँका असा शेतकऱ्यांना त्रास देत असून यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी,अशी निवेदनातून मागणी रयत क्रांतीचे युवा जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर , किरण पाटील जाहुरकर,बजरंग दलाचे तालुका संयोजक शंकर नाईनवाड,रयत क्रांतीचे शहराध्यक्ष संजय पिल्लेवाड, माधव शिंदे,निरंजन गंदीगुडे यांनी केली आहे.