संत ज्ञानेश्वर महाराजाच्या मुर्ती चोरास तात्काळ अटक करा  –  अन्यथा आंदोलन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

विविध पदाधिकाऱ्यांंचे पोलिस निरीक्षकांना निवेदन

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
            मुखेड शहरातील संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या मुकुट चोरीला गेल्याची घटना दि. 19 रोजी च्या मध्यरात्री घडली याचे तिव्र पडसाद तालुक्यात उमटले असुन दि. 21 रोजी राजकीय, सामाजिक विविध पदाधिकाऱ्यांंनी मुखेड पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांची भेट घेऊन संत ज्ञानेश्वर महाराजाच्या मुर्ती चोरास तात्काट करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे  निवेदन दिले.
संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या मंदीराच्या जिर्नोध्दाराचे काम चालु असल्याने संत ज्ञानेश्वरमहाराजांचा मुखवटा राम मंदीरात ठेवण्यात आला चोरटयाने हा मुखवटा व टोप चोरल्याने नागरीक संतापले असून जवळच सराफा मार्केट असुन अशाने व्यापायात सुध्दा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या पोलिस स्टेशनजवळ पोलिस चौकी उभारावी व या अज्ञात चोरास तात्काळ अटक करावी अन्यथा आंदोलन केले जाईल असे  या विविध पक्षीय निवेदनाव्दारे करण्यात आली.
                 यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल जाजु, नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय बेळीकर, शंकर अण्णा पोतदार, शंकर पाटील लुट्टे, शहरप्रमुख नागनाथ लोखंडे, सुनिल मुक्कावार, विहिंपचे महेश मुक्कावार, संजय वाघमारे, बजरंग दलचे शंकर नाईनवाड, गिरीष देशपांडे, भगवान गुंडावार, नगरसेवक गोविंद घोगरे, किशोरसिंह चौहाण, सतिष महिंद्रकर, सचिन श्रीरामे, प्रमोद मदारीवाले, संदिप पोफळे, विनोद रोडगे, विनोद दंडलवाड, इम्रान आत्तार आदी उपस्थित होते.
दरम्यान कालच अज्ञात चोरटयाविरोधात मुखेड पोलिसात भा.दवि. 1960 नुसार कलम 380 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.