Tuesday, April 13, 2021

काळा चहा पिणाऱ्यांना ‘हे’ 6 रोग कधीच होत नाहीत…

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला काळा चहा पिण्याचे कोणकोणते फायदे आपल्या शरीरास होत असतात, हे जाणून घेणार आहोत. काळा चहा पिण्याचे खूप सारे फायदे आपल्या शरीराला होत असतात, जे लोक काळा चहा पित नाहीत किंवा दूध टाकलेला चहा पितात त्या लोकाना  सांगू इच्छितो की, ही सर्व माहिती वाचल्यानंतर आजपासून काळा चहा पिण्यास सुरवात कराल, अशी आम्हास खात्री आहे. जे लोक नियमितपणे काळ्या चहाचे सेवन करतात त्यांना सर्वात मोठा होणारा फायदा म्हणजे त्यांचा मेंदू तल्लक राहतो आणि याचे कारण असे आहे की कोरा चहा सेवन केल्याने आपल्या मेंदूला चांगल्या प्रकारे रक्त प्रवाह होतो.

रक्त प्रवाह वाढतो व तो वाढल्यामुळे परिणामी मेंदूच्या पेशी स्वस्थ राहतात, आणि त्यामुळेच आपल्या स्मरण शक्तिमध्ये वाढ होऊ शकते. जर तुम्हाला बौद्धिक कामे मोठ्यावर प्रमाणात असतील आणि जर तुमचा मेंदू थकून जाईल अश्या प्रकारची कामे करत असाल तर अशा बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तींनी आवर्जून काळा चहाचे सेवन करायला हवे. याचा दुसरा एक फायदा म्हणजे ज्यांना खूप सारा तणाव आणि थकवा येतो लहान-सहान गोष्टीवरून जे टेंशन मध्ये येतात, अश्या लोकांनी देखील स्ट्रेस दूर करण्यासाठी काळा चहाचे नियमितपणे सेवन केल्याने तणाव आणि स्ट्रेस कमी करण्याचे काम हा काळा चहा करतो.

तिसरा फायदा आहे, तो म्हणजे कॅन्सरशी संबंधित, तुम्हाला तर माहीतच आहे की कॅन्सर चे प्रमाण खूप वाढले आहे, अगदी सेलिब्रेटींना देखील कॅन्सरने पछाडलेले आहे. आणि जर कॅन्सर पासून बचाव करायचा असेल तर आपण आपल्या आहारामध्ये काही पदार्थ घ्याययला हवेत आणि त्यातीलच एक महत्वाचा पदार्थ म्हणजे ‘काळा चहा’ आपण जर काळ्या चहाचे नियमितपणे सेवन केले तर, आपल्याला अनेक प्रकारच्या कॅन्सर्सपासून आपला बचाव होऊ शकतो. चौथा फायदा आपल्या हृदयाशी संबंधित आहे, जर तुम्हाला स्वस्थ हृदय हेवा असेल जर तुमच्या बॉडीमधील, रक्तातील कोरेस्ट्रॉल वाढले असेल तर तुम्ही देखील काळा चहा आजपासून घ्यायला सुरुवात करा. कारण  या काळ्या चहामध्ये फ्लेवनहर्ट्स चे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि फ्लेवनहर्ट्स मोठ्याप्रमाणात असल्यामुळे आपल्या रक्तातील कोरेस्ट्रॉलप्रमाण कमी होते. परिणामी रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते आणि धमन्या निरोगी राहतात.

धमन्या म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या नसा दिसतात वरती त्यांच्या खाली धमन्या असतात त्या जर निरोगी राहिल्या तर आपले हृदय देखील निरोगी राहील. आणि परिणामी heart attack येण्याचे प्रमाण आपोआप कमी होते. पाचवा फायदा आहे पचनाशी संबंधितचा फायदा, जर आपल्याला gas आणि acidity चा त्रास असेल तर काळा चहा नियमितपणे सेवन करा, gas आणि acidity पासून आपला बचाव होईल. जर आपल्याला पोठदुखीचा त्रास होत असेल तर काळा चहा जास्त उखळा आणि हा चहा तुम्ही सेवन करा. त्यामुळे पोटदुखी देखील दहा ते पंधरा मिनिटात थांबून जाईल. पुढील सहावा आणि महत्वाचा फायदा म्हणजे स्किन प्रॉब्लेम….!! तुम्हाला स्किन प्रॉब्लेम माहीतच असतील त्यातील एक म्हणजे जर आपल्या चेहऱ्याला सुरतुक्या पडल्या असतील तर त्यावरती हा एक चांगला उपचार आहे.

तुम्ही नियमितपणे काळा चहा सेवन करा सुरतुक्यांचे प्रमाण कमी होईल, याला तुम्ही योगासन आणि प्राणायम यांची जोड देऊ शकता. काळ्या चहामध्ये अँटीऑक्सिडन्ट चे प्रमाण फार मोठे आहे आणि या अँटीऑक्सिडन्ट मुळेच त्वचेशी संबंधित जे कॅन्सर आहेत स्कीन कॅन्सर्स तर या त्वचेच्या कॅन्सर्स पासून आपला बचाव करण्याचे काम हा काळा चहा करत असतो.
           तर मित्रांनो अश्या प्रकारे याचे अनेक फायदे सांगता येतील वेळे अभावें आम्ही पाच ते सहा फायदे या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहेत, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा, माहिती आवडल्यास शेअर नक्की करा

 

error: Content is protected !!