मुखेडात संत ज्ञानेश्वर महाराजाच्या मुखवटयाची चोरी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
       राम मंदीरात चोरी झाल्याने शहरात खळबळ

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड 

मुखेड शहरातील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मुकुट राम मंदिरातून चोरीला गेल्याची घटना दि. 19 रोजी च्या मध्यरात्री घडली.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदीराच्या जिर्नोध्दाराचे काम चालु असुन काम पुर्ण होईपर्यंत मंदीरातील संत ज्ञानेश्वर महाराज यांचा मुखवटा राम मंदीरात ठेवण्यात आला पण दि. 19 रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरांनी हा मुखवटा व टोप अंदाजे 500 ते 600 ग्रम वजनाचा चोरी केला.
ही घटना कळताच पुजारी व सर्व भक्त दि. 20 रोजी एकत्र येऊन अज्ञात चोरटयाविरोधात मुखेड पोलिसात फिर्यादी उध्दव कवटीकवार वय 52 वर्ष रा. मुखेड यांच्या फिर्यादीवरुन भा.दवि. 1860 नुसार कलम 380 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.

              याचा तपास पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर व पोउनि गणपत चित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सुभाष पवार हे करीत आहेत. मागील आठ ते दहा दिवसापुर्वी चोरटयांनी शहरात एकाच रात्री सात ते आठ ठिकाणी दरोडा टाकला होता तर त्यातील चोरीच्या घटनेत काही ऐवज सुध्दा चोरटयांनी लंपास केला होता .


                   शहरात चोरीच्या घटनेत शहरात वाढ होताना दिसत असुन राम मंदीरात चोरी झाल्याने शहरात खळबळ उडाली असुन अनेक नागरीकांच्या मनात चोरीच्या भितीचे वातावरण असुन पोलिसांनी गस्त वाढवावी व चोरटयास तात्काळ अटक करावी यासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय बेळीकर , शंकरअण्णा पोतदार पोलिस स्टेशनला भेट दिली तर शेकापचे अॅड गोविंद डुमणे,असद शेख यांनी निवेदन ही दिले आहे.