कुंद्राळा प्रकल्पातील पाणी शेतीसाठी सोडण्याची ढोसणे यांची जिल्हाधिकार्‍याकडे मागणी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
                 मुखेड तालुक्यातील बार्‍हाळी परीसरात सर्वात जास्त अतिवृष्टीची नोंद झाल्याने खरीप हंगाम हातचा गेल्याने कुंद्राळा प्रकल्पातील  पाणी शेतकर्‍यांना रब्बी हंगाम व ऊन्हाळी हंगामासाठी कालवे दुरुस्त करुन सोडण्याची मागणी बालाजी पाटील ढोसणे यांनी दि १८ रोजी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍याकडे केली.
             कुंद्राळा मध्यम प्रकल्प पुर्ण तुडुंब भरल्याने अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचा खरीप हंगाम हातचा निघुन गेल्याने शेतकरी आर्थीक डबघाईला आला असुन त्यामुळे कुंद्राळा मध्यम प्रकल्पाचे पाणी रब्बी व ऊन्हाळी हंगामासाठी शेतीसाठी सोडुन शेतकर्‍यांना दिलासा देण्याची मागणीही ढोसणे यांनी केली.
            कुंद्राळा प्रकल्प अनेक वर्षानंतर १०० टक्के भरला असुन गेली अनेक वर्ष शेतीसाठी पाणी बंद असल्याने कालव्यात गाळ साचला असुन ते कालवे दुरुस्त करुन कालव्यातील गाळ काढुन डागडुजी करुन तात्काळ पाणी सोडावे यामुळे बार्‍हाळी,कबनुर,मांजरी,थोटवाडी,सकनुर,बापशेटवाडी,जिरगा,हिप्पळनारी,सुगांव आदी गावातील शेतकर्‍यांना लाभ होणार असल्याने तात्काळ याप्रकरणी जिल्हाधिकारीनी संबधित विभागास आदेश देवुन पाणी सोडुन शेतकर्‍यांना दिलासा देण्याची मागणी शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे यांनी निवेदना द्वारे केली.