आदिवासीच्या हक्काचे संरक्षण व अमलंबजावणी बाबत कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड
            आदिवासीच्या हक्कांचे संरक्षण व अंमलबजावणी बाबत कायदेविषयक शिबिराचे आयोजन मुखेड तालुक्यातील अंबुलगा (बु.) ग्रामपंचायत येथे करण्यात आले. यावेळी कायदेविषयक मार्गदर्शन नागरिकांना करण्यात आले आहे.
                 तालुका विधी सेवा समिती, मुखेड व तालुका अभिवक्ता संघ , मुखेड यांचे संयुक्त विद्यमानाने दि. १६  रोजी आदिवासीच्या हक्काचे संरक्षण व अमलंबजावणी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर  अंबलुगा (बु )ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आले आहे.
                   या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्यायाधीश एस.टी शिंदे , प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश   एस. जी. शिंदे, अभिवक्ता संघाचे उपाध्यक्ष  अँड एन. पी. हाक्के ,  सचिव अँड. जी.डी.डुमणे,सहाय्यक सरकारी वकील अँड. सुनील  चाैरे, अभिवक्ता संघ सदस्य अँड. रामकिशन इमडे, अँड.गजानन  शिंदे ,अँड. अस्लम शेख , अँड. अंतेश्वर गोगे, अँड. तांबोळी ,  आणि न्यायालयीन कर्मचारी श्री एम. पी. मुखेडकर, सुर्यवंशी, पोलीस कॉ. ठाकुर  आणि  गावातील उपसरपंच विनोद गोविंदवार  , पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष , ग्रामपंचायतीतील सदस्य उपस्थित होते.
    या कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्री विनोद गोविंदवार यांनी केले. न्यायाधीश  एस.जी. शिंदे यांनी आदिवासीच्या हक्काचे संरक्षण व अमलंबजावणी या विषयावर  मार्गदर्शन केले. न्यायाधीश  श्री एस.टी. शिंदे यांनी  अध्यक्षीय समारोप केला आहे. अॅड अस्लम शेख यांनी मनोगत व्यक्त केले आहे. श्री जी. डी. डुमणे यांनी सर्वांचे आभार मानले.
             यावेळी गावकर्यांना विधी सेवा साक्षरता माहिती पर पत्रके  वाटप करण्यात आले . गावातील ग्रामपंचयातचे सदस्य,गावातील प्रतिष्ठित नागरिक,आदिवासी समाजाचे नागरिक,महिला,पुरुष,युवक,विध्यार्थी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,कॉम्रेड माधव देशटवाड,कॉम्रेड माणिक घोणसेटवाड, कॉम्रेड अनिल पांचाळ,कॉम्रेड श्याम आकुलवाड,पंढरी अण्णा,रामू अण्णा,सुरेश दादा,पार्वती माळीताई,गावातील आदिवासी तरुणांनी विशेष परिश्रम घेऊन कॅम्पेनिंग केली.ग्रा. पं. चे सेवक माधव कांबळे,ऑपरेटर शैलेश गंदिगुडे, दत्तू पाटील यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.