राष्ट्रीय पत्रकार दिनानिम्मित पत्रकारांचा सन्मान 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त  चौव्हान परिवार व टायगर ग्रुपच्या वतीने दि.१६ नोव्हेंबर रोजी चौव्हाण हार्डवेअर मुखेड येथे पत्रकार बांधवाचा पुष्पहार व लेखणी देवून अारुनसिंह चौव्हाण,सतीषसिंह चौव्हाण व टायगर ग्रुपचे तालुकाध्यक्ष धनराजसिंह चौव्हाण यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश बंडे,  टायगर ग्रुप ता .प्रभारी दयानंद गायकवाड, पृथ्वीराजसिंह चौव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रीय पत्रकार दिनाचे अौचीत्य साधून घेण्यात आलेल्या या  कार्यक्रमात पत्रकार सुशिल पत्की, सचिव अनिल कांबळे, दत्तात्रय कांबळे, ज्ञानेश्वर डोईजड, महेताब शेख, के.एन.कांबळे, अॅड मिलिंद कांबळे, रियाज शेख, जयभिम सोनकांबळे, संदीप पिल्लेवाड, जगदीश जोगदंड सह पत्रकार  बांधव व मित्रपरिवार उपस्थित होते