शालेय विद्यार्थ्यांनी समाजसुधारकांची प्रेरणा घ्यावी –  न्यायाधीश नमृता बिरादार 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

    बालदिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले आपले मत

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

           शालेय विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षेत यश मिळून अधिकारी बनावे व नावलौकिक मिळवावा. समाजसुधारकांची प्रेरणा घेऊन इतरांना ज्ञान देण्याचे काम करावे तरच बाल दिन साजरा केल्याचे सार्थक होणार  आहे असे प्रतिपादन मुखेड न्यायालयातील न्यायाधीश नमृता बिरादार यांनी  मुखेड येथील जिल्हा परिषद मुलींचे विद्यालय येथे शुक्रवारी दिनांक 15 रोजी आयोजित बाल दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
         यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश अतुल सलगर, वरिष्ठ स्तर न्यायाधीश एस.टी. शिंदे,  तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा  न्यायाधीश एस जी शिंदे अभियोक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. धनंजय येवतीकर,  सचिव गोविंद डुमणे, गटशिक्षणाधिकारी राम भारती, मुख्याध्यापक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
             कार्यक्रमास अॅड. आशिष कुलकर्णी, अॅड.  रहिमखान, अॅड.अंतेश्वर घुगे, न्यायालयीन कर्मचारी यावेळी उपस्थित होते. तालुका विधी सेवा समिती व अभीवक्ता संघ यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात नंदिता स्वामी या विद्यार्थीनीने स्वागत गीत गाऊन मनोगत व्यक्त केले.
             शाळेतील शिक्षिका मनोतणी लोणीकर यांनी प्रास्ताविक केले. वेदिका केंद्रे या विद्यार्थिनीने बालदिनाचे महत्त्व सांगितले. शाळेतील शिक्षक विश्वंभर जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार प्रदर्शन व्यक्त केले कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री चव्हाण, सहशिक्षक गजानन धनशेट्टी,  केंद्रे, दिलीप देवकांबळे लोहबंदे इनामदार, सविता उमाटे, एस एच हराळे, एसजी टाकळीकर, अश्विनी कुलकर्णी, ये एम स्वामी, स्वामी सर, रुद्रवार सर,  कांबळे सर पोलीस कर्मचारी ठाकूर व इतर अनेक जण व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी  न्यायाधीश  नमृता बिरादार यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले आहे.