शरद पवार पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर ; राज्यात सत्तासंघर्ष सुरुच

ठळक घडामोडी महाराष्ट्र

नागपूर | राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू असून महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र राज्यातील सत्तेचा पेच बाजूला सारून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली आहे.

नागपूर जिल्ह्यातील चारगाव, काटोल येथील नुकसानग्रस्त भागाची शरद पवारांनी आज पाहणी केली आहे. तसेच तिथल्या शेतकऱ्यांशी पवारांनी संवाद साधला आहे. शरद पवारांनी पीडित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.