महाशिवाघाडीची सत्ता आल्यास असे असू शकते मंत्रिमंडळ

ठळक घडामोडी महाराष्ट्र

महाशिवआघाडीची सर्व समीकरणे जुळून आली तर पहिल्या अडीच वर्षात शिवसेनेचे मुख्यमंत्री, दुसऱ्या अडीच वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राज्याला मिळेल. काँग्रेसकडे ५ वर्षे उपमुख्यमंत्रिपद असेल.

कोणत्याही परिस्थितीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे तिन्ही पक्ष सत्ता समीकरणांची जुळवाजुळव करत आहेत. महाराष्ट्रात जास्तीत जास्त ४३ मंत्री असू शकतात. त्यात एक मुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री सोडला तर उरतात ४१ मंत्रिपदे. त्यातील मंत्रिपदांचे वाटप संख्याबळानुसार केले जाऊ शकते. त्यात शिवसेनेला १४, राष्ट्रवादीला १३ ते १४ आणि काँग्रेसला ११ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.