तळेगाव येथील सरपंच उपसरपंच यांचे सदस्यत्व रद्द विभागीय आयुक्त चा निकाल   

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा हदगाव
हदगाव :  देवानंद हुंडेकर
             तळेगाव ता हदगाव येथील महिला सरपंच व उपसरपंच त्यांचे ग्रामपंचायतचे सदस्यत्व रद्द करण्याचा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचा निर्णय कायम ठेवण्याचा निकाल विभागीय अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे त्यांनी कायम ठेवण्याचा आदेश दिला असून दोघांचे सदस्यत्व रद्द होण्यामुळे पायउतार व्हावे लागले आहे.
               गावातील तक्रार बालाजी फुलसिंग जाधव यांनी गावातील सरपंच उपसरपंच गावातील विकासासाठी आलेला शासकीय निधी स्वतःच्या पत्नीचे नावे उचल करून ग्रामपंचायत अधिनियम कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे दोघाचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय येथे केली होती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी 14 जून 2019 रोजी याबाबतचा निकालात सरपंच उपसरपंचचाचे सदस्यत्व तक्रारीतील आरोपांमध्ये सत्यता काढल्यामुळे रद्द केली होते या निकालाला अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे यांच्या कार्यालयात 19 जून 2019 आव्हान देत स्थगिती मिळवली होती .
                 तक्रारदार जाधव यांनी गटविकास अधिकारी हाताशी धरून खोटा चुकीचा अहवाल बनवला आहे तसेच तक्रारदार हे गावचे माजी सरपंच त्यांनी विकास कामासाठी आलेल्यांनी निधीतील खर्च दिल्यास मी तक्रार करणार नाही अशी बेकायदेशीर मागणी केली पण मागणी मान्य झाली नसल्यामुळे तक्रारदाराने राजकीय द्वेषातून तक्रार केली असून ती रद्द करण्यात यावी सरपंच व उपसरपंच यांच्या वकिलांनी युक्तीवाददरम्यान केली ही माहिती अप्पर विभागीय आयुक्तांनी फेटाळली अपर विभागीय आयुक्तांनी याप्रकरणी अपीलअर्थी व प्रतिवादी यांच्या वकिलांनी सादर केलेली म्हणी पुरावे व्यक्तिवाद ऐकून निर्णय दिला आहे.
              त्यामध्ये तळेगाव येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच स्वतः किंवा पती द्वारे शासनाच्या विकास निधी साठी आलेली रक्कम उचल केली आहे याबाबतचा गटविकास अधिकारी पंचायत समिती हदगाव यांचा अहवाल महत्त्वाचा पुरावा निकालासाठी ग्राह्य धरण्यात आला आहे परिणामी अपील आर्थी यांचा आपली अर्ज नामंजूर करून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचा  ता 14 जून 2019 चा आदेश कायम ठेवण्यात येत आहे असे टेकसाळे  यांनी निकालात  स्पष्ट केले