मुखेड राज्यमहामार्गावर होकर्णा पाटी येथे कारचा भिषण अपघात

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 अपघातात कारचा चकनाचुर तर चालकाची प्रकृती चिंताजनक 

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड – नरसी राज्य महामार्गावर मुखेडहुन नरसी कडे जात असताना होकर्णा पाटीच्या वळण रस्त्यावरुन वेगात जात असलेल्या कार चालकाचा ताबा सुटल्याने विद्युत पोलला कार धडकली. या भिषण अपघातात कारचा चकनाचुर झाला तर चालकाची प्रकृती चिंताजनक  असून सदर घटना दि. 06 रोजी मध्यरात्री १ ते २ च्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे की, काळया रंगाची कार एम एच क्र. 24 एएस 3248 ही या क्रमाकांची कार मुखेडहुन नरसीकडे जात असताना मुखेडजवळच असलेल्या होकर्णापाटी जवळील वळण रस्त्यावरुन सुसाट वेगावे जात असताना अचानक कार चालकाचा ताबा कारवरुन सुटल्याने रोडपासुन दहा फुट अंतरावर असलेल्या विद्युत प्रवाह चालु असलेल्या पोलवर जाऊन धडक बसली यात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला असुन यात चालक गंभीर जखमी झाला असुन त्याची प्रकृति चिंताजनक असल्याचे समजते.

कार पोलला जाऊन धडक मारल्याने पोल पुर्णत: वाकला असुन यामुळे मध्यरात्री विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता तर पोल वरील विद्युत तारा रस्त्यावर पडल्याने दोन तास वाहतुक खोळंबली होती ही माहिती महावितरणाच्या कर्मचाऱ्यांंना मिळताच रस्त्यावरील पडलेली तारे बाजुला करुन वाहनांना वाट मोकळी करुन दिली.

वाहन चालक बालाजी बाबुराव स्वामी वय 25 वर्ष रा. तांदळी ता. मुखेड येथील असून  वाहन चालकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यास नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे निकटवर्तीयांंनी माहिती दिली.