अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतक­ऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत दया – चौधरी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

तालुक्यातील शेतक­ऱ्यांचे हाती आलेले पिकाचे पावसामुळे पुर्णत: नुकसान झाले असुन पंचनामे, नुकसानी दौरा न करता अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतक­यांना प्रति हेक्टरी 50 हजार पिक विमा मंजूर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे तालुका सनन्वयक तथा विधानसभा अध्यक्ष प्रताप चौधरी यांनी दि. 05 रोजी तहसिलदार काशिनाथ पाटील यांच्याकडे केली.

तालुक्यात शेतक­ऱ्यांचे सोयाबीन, कापसु, तुर अशा प्रमुख पिकांसह अन्य पिकाचे मोठे नुकसान झाले असुन शेतक­ऱ्यांच्या शेतातील पिकासह माती सुध्दा वाहुन गेली आहे. यावेळी शासनाने शेतक­ऱ्यांना तात्काळ मदत करणे गरजेचे असताना पाहणी दौरा, पंचनामे अशात वेळकाढूपणा करत असल्याने शेतक­ऱ्यांत शासन व प्रशासनविषयी तिव्र नाराजी असुन

शेतक­ऱ्यांना उभारी देण्यासाठी सर्व नियम बाजुला ठेवून तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपयाचा पिक विमा मंजुर करावा असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.


           यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे तालुका सनन्वयक तथा विधानसभा अध्यक्ष प्रताप चौधरी यांच्यासह , राष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजी उमरदरीकर, शादुल होनवडजकर,जयभिम सोनकांबळे,अँड लक्ष्मण सोमवारे,युराजसिंह चौहाण,संभाजी मुकनर,कैलास मादसवाड,जी.एस. कदम आदी उपस्थित होते.