शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मंजूर करा – कलंबरकर      कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे मागणी 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
          अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे महसूल-कृषी प्रशासनाकडून करण्यात आलेले पंचनामे विमाकंपणीला विमा-मंजूर करण्यासाठी ग्राह्य धरायला लावून याआधारे शेतकऱ्यांचा पीकविमा मंजूर करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देवून  शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मंजूर करावा अशी मागणी  युवा रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष  शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी नांदेड जिल्हा पिकांच्या नुकसानीची पाहणी दौऱ्यावर कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत आले असताना केली.
             अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे पूर्णतः नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे महसूल-कृषी विभागाकडुन करण्यात येत आहेत.मात्र विमा-कंपनीने आज पर्यंत केवळ नुकसानीची माहिती ऑनलाइन पद्धतीने कळविण्यात गुंतून ठेवले आहे. ऑनलाइन मेल लोडमुळे जात नाहीत ही जाचक अट रद्द केली करून पिकांच्या नुकसानीचे महसूल-कृषी विभागाकडून जे पंचनामे करण्यात येत आहेत.हेच पंचनामे विमा-कंपनीला विमा-मंजूर करण्यासाठी गृहीत धरायला लावण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात यावेत असेही या निवेदनात नमूद आहे.
       यावेळी प्रदेशाध्यक्ष पांडुरंग पाटील, युवा रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष  शिवशंकर पाटील कलंबरकर, दिलीप पाटील बनबरे,व्यंकट शिंदे,शिवाजी गायकवाड,विष्णू पाटील  आदी उपस्थित होते.