मुखेडात घरफोडी ; 70 हजारांचा माल लंपास  श्वानपथक व फिंगरप्रिंट पथकांना पाचारन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड :  ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड शहरातील फुले नगरसह इतर ठिकाणी दि. 03 रोजीच्या मध्यरात्री वेगवेगळया ठिकाणी चोरांनी घरफोडी करुन 70 हजार रुपयांचा माल चोरी केल्याची घटना घडली .

                 सविस्तर वृत्त असे की, शहरातील शेख ताजोदीन उस्मानसाब रा. फुले नगर यांच्या फिर्यादीवरुन यांच्या घरातील 30 हजार रुपयाचे 11 ग्रॅम सोन्याचे गलसर व 15 हजार रुपयाचे 6 ग्रॅमचे सोन्याचे कानातील फुले व 10 हजार रुपयाचे मुलीच्या कानातील सोन्याचे तसेच 15 हजार रुपयाचे सोन्याची अंगठी असा एकुण 70 हजार रुपयाचा माल चोरटयाने पळविला. तर याच नगरातील इतर तीन ठिकाणीही घर फोडले पण यात चोरांच्या हाती काही लागले नाही.

                 तर शहरातील वाल्मिक नगर मधील मोहम्मद फेरोज शेख, संतोष शिवराज पेंडलवाड यांचे घर सुध्दा चोरटयाने फोडले तर तबेला गल्ली मध्ये एक ठिकाणी चोरटयाने घर फोडल्याची घटना दि. 03 रोजीच्या मध्यरात्री घडली.

ही घटना कळताच मुखेड पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांच्या

मार्गदर्शनाखाली  पोउनि गणपत चित्ते, पोलीस जमादार चंदर अंबेवार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करुन वरीष्ठ कार्यालयास कळविले असुन याचा मागोवा घेण्यासाठी श्वानपथक व फिंगरप्रिंट पथकांना पाचारण केले असल्याची माहिती मुखेड पोलिसांनी दिली.

             तर या घटनेचा तपास पोउनि गणपत चित्ते यांच्याकडे असुन ताजोदीन उस्मानसाब शेख  यांच्या फिर्यादीवरुन मुखेड पोलिसात अज्ञात चोरटयाविरुध्द भा.दं.वि. 1860 कलम 457,380 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.