पोउनि मिथुनकुमार सावंत यांना गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड 


मुखेड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मिथुनकुमार सावंत यांनी भामरागड (जि. गडचिराेली) येथे नष्कलग्रस्त भागात केलेल्या कार्याची दखल घेत महात्मा फुले शिक्षक परिषदेच्या वतीने गृहराज्यमंत्री दिपक केसरकर व माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार देऊन   सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम शरद भवन आॅॅराेस बु्द्रुक (जि. सिंधुदुर्ग ) येथे रविवारी (ता.3) झालेल्या महात्मा फुले शिक्षक परिषदेच्या 9 व्या राष्ट्रीय अधिवेशन आयाेजित करण्यात आले हाेते.

 


यावेळी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर , माजी खासदार सुधीर ब्रिगेडियर , आमदार हुस्नबानु खलिफे ,महात्मा फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव , वैभव नाईक यांची प्रमुख  उपस्थिती हाेती. भामरागड (जि. गडचिराेली) येथे प्रतिकुल परिस्थिती मध्ये फाैजदार सावंत यांनी भरीव कार्य केले हाेते. 


            यामध्ये नक्सली विचारांने प्रभावित झालेल्या युवकांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याची दखल घेत यापुर्वी महाराष्ट्र शासनाने पाेलिस महासंचालक पदक , विशेष सेवा पदक व आंतरिक सुरक्षा पदक आदींने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार प्रदान केल्याबद्दल जिल्हा पाेलिस अधिक्षक विजय कुमार मगर , अतिरक्त पाेलिस अधिक्षक दत्तराम राठाेड, उपविभागीय पाेलिस अधिकारी डाॅ.सिद्धेश्वर धुमाळ , रमेश सराेदे , स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक शिवाजी डाेईफाेडे , पोलीस निरीक्षक  नरसिंग आकुसकर , पोलीस उप निरीक्षक  बी.एस. मगरे, गजानन काळे, अनिता इटुबाेने , गणपत चिट्टे , पाेलिस पाटील माधव टाकळे आदींनी अभिनंदन केले आहे.